शिवरत्न शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नअभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे यांची प्रमुख उपस्थिती
अकलूज: शिवरत्न शिक्षण संस्था संचलित सीबीएससी स्कूल हर्मोनी च्या शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या सोहळ्यास मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करताना उर्मिला कानिटकर कोठारे यांनी त्यांच्या सादरीकरणाचे विशेष अभिनंदन केले.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने वर्षभरातील शैक्षणिक, क्रीडा व इतर उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार व बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये उत्कृष्ट शैक्षणिक पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी कार्यकारी अभियंता सुनीता पाटील, संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील, देवश्री मोहिते पाटील, इशिता मोहिते पाटील, सचिव धर्मराज दगडे तसेच संचालक व प्राचार्य अल्बर्ट थकरन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवरत्न शिक्षण संस्था केवळ शैक्षणिक प्रगतीपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देत असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
संपूर्ण स्नेहसंमेलन उत्साह, आनंद आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले.






