चाकोरे-प्रतापनगर येथे गुरुवारी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; सायंकाळी संकेत महाराज यादव यांचे कीर्तन
चाकोरे: छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, चाकोरे-प्रतापनगर यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
डी.सी.सी. बँकेसमोर हा सोहळा पार पडणार आहे.या दिवशी सकाळी ८ वाजता गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येईल.
त्यानंतर सकाळी ९.३० ते १० या वेळेत शिवआरती होईल.या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि ‘झी टॉकीज फेम’ ह.भ.प. संकेत महाराज यादव (फलटण) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यांना श्रीराम भजनी मंडळ, चाकोरे हे मृदंग आणि टाळकरी साथ करणार आहेत.
तरी पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनी व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.






