*छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पारंपरिक वाद्यांसह साजरी करावी*उपविभागीय अधिकारी व अकलूज पोलीस याचे अवाहन
प्रतिनिधी : रणजितदादा गायकवाड
जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या अहवानानुसार येथुन पुढे सर्व जयंती उत्सव डिजे मुक्त होणार आहेत जे डिजे लावतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊन कडक कारवाई केली जाईल आसे अकलूज पोलिस स्टेशन येथे शांतता कमिटीच्या बैठकीत शिवजयंती उत्सवाचे पार्श्वभूमीवर अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत शिवजयंती मंडळाचे बैठक अकलूज पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली
शिवजयंती मंडळाचे बैठक अकलूज पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना अकलूज उपविभागीय अधिकारी वाळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे सर यांनी सागितले की मागील वर्षी गणेशोत्सवापासून डीजे मुक्तीचे धोरण जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले आहे
पोलीस निरीक्षक उबाळे सर यांनी पुढे सांगितले की डीजे च्या आवाजाने बहिरेपणा येतो हृदयवेकरचा फार मोठा त्रास होतो लेझर लाईट मुळे डोळ्यांना इजा होऊ शकते यामुळे येथून पुढे साजऱ्या होणाऱ्या सर्व जयंती उत्सव हे पारंपारिक वाद्यांसहच साजऱ्या व्हाव्यात
जर कोणी डीजे लावण्याचा प्रयत्न केलातर संबंधित मंडळावर तसेच डिजे चालक मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल कडक कारवाई करण्यात येईल
यावेळी अकलूज व परिसरातील शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधीकारी उपस्थित होते






