नीरा नदीत उभा राहणार स्वराज्याचा अभिमान – अकलूजमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य तरंगता देखावा
अकलूज (प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अकलूज शहरात नीरा नदीत भव्य असा तरंगता देखावा साकारण्यात येणार आहे.
या अनोख्या उपक्रमाचे आयोजन ग्रामस्थ सूरज भारत कुंभार व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
नवीन बाजार तळ, प्रभाग क्रमांक ८ येथील ग्रामस्थांच्या वतीने हा देखावा नीरा नदीत सराटी फुलाजवळ साकारला जाणार असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यपूर्ण आणि तेजस्वी अवतार आकर्षक पद्धतीने मांडण्यात येणार आहे.
या देखाव्याद्वारे शिवरायांचे स्वराज्याचे विचार, त्यांचे पराक्रम व राष्ट्रभक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आयोजकांचा उद्देश आहे.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा तरंगता देखावा सर्वांसाठी खुला राहणार आहे.
नीरा नदीच्या पाण्यावर उभारलेला हा भव्य देखावा पाहण्यासाठी परिसरातील तसेच आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.आयोजकांच्या वतीने सर्व शिवप्रेमी, नागरिक व कुटुंबीयांना हा देखावा पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवजयंतीचा उत्सव केवळ साजरा न करता शिवरायांचे विचार आत्मसात करून त्यांचा आदर्श जपण्याचा संदेशही या माध्यमातून देण्यात येणार आहे.






