*शेकडो तरूण अनवानी फिरतात मुंडन करतात एकवेळचे जेवतात आवडिच्या गोष्टींचा त्याग करतात*
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
४०-४१ अंशाचा तापमानात शेकडो तरुण मुले अनवाणी फिरतात एक वेळ जेवण करतात मित्रांबरोबर खाणे चहा पिणे आनंदी सोहळे आयोजित करणे त्यामध्ये सहभागी होणे वर्ज्य करतात
असे चित्र माळशिरस तालुक्यात तसेच पूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळते
निमित्त धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास वढूबुद्रुक येथून ज्वालाच्या रूपाने छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा देणारी ज्वाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे
या सर्वांची प्रेरणा आहे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडेगुरूजी.
हिंदवी स्वराज्यासाठी प्रचंड झुंज देणारे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने पकडले गेलेल्या क्षणापासून त्यांचा पाशवी छळ करून त्यांचा रोज एक एक अवयव संपूर्ण महिनाभर तोडत होते.रोज अंगाची साल सोलून काढत होते
शेवटी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे कुराडीने तुकडे तुकडे केले.म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर धीरोधात्तपणे चालत होते.
म्हणूनच त्यांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोज सामाजिक कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर प्रत्येक दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढली जाते.
अकलूज व परिसरात दररोज तरुण शालेय मुले नागरिक अकलूज मधील विजय चौक या ठिकाणी जमतात.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दररोज नतमस्तक होतात पूजन करतात रोज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करतात
या काळात धारकरी तरुण नवीन खरेदी करत नाहीत सण उत्सव साजरे करत नाहीत आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी होत नाहीत असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे माळशिरस तालुकाप्रमुख गणेश इंगळे व अकलूज शहर प्रमुख सुधीर पवार यांनी सांगितले
*यावर्षी १८फेब्रुवारी ते १८मार्च या कालावधीत बलिदान मास पाळला जाणार आहे*






