इतिहासाचे सुवर्णपान रुपेरी पडद्यावर; ‘रणपती शिवराय: स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित!
अकलूज (प्रतिनिधी): शिवराज अष्टकातील सहावे पुष्प असलेला आणि शिवप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो ‘रणपती शिवराय: स्वारी आग्रा’ हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा भव्य ऐतिहासिक चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.आग्र्याचा थरार आणि सुटकेचा गनिमी कावादिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि तितक्याच बुद्धिचातुर्याच्या प्रसंगावर प्रकाश टाकला आहे.
औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याच्या लाल किल्ल्यातून महाराज आपल्या पुत्रासह, संभाजी राजांसह कसे सुखरूप निसटले, याचा अंगावर काटा आणणारा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
नवा चेहरा, नवा उत्साहया चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका. यावेळी शिवराज अष्टकात पहिल्यांदाच अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र शिवरायांच्या तेजस्वी भूमिकेत दिसणार आहे.
नुकत्याच झालेल्या प्रीमियर सोहळ्यात त्याच्या अभिनयाचे आणि ‘लूक’चे मोठे कौतुक झाले आहे. त्यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकताचित्रपटाचा ट्रेलर आणि ‘महारुद्र शिवराय’ या गाण्याने सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घातला आहे. “न भूतो न भविष्यती” अशा या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमींनी आगाऊ नोंदणी सुरू केली आहे
.”हा केवळ चित्रपट नसून, आपल्या अस्मितेचा आणि जाज्वल्य इतिहासाचा हुंकार आहे,” असे मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केले आहे.







