“माळशिरसचा महासंग्राम: मोहिते-पाटील आणि जानकरांच्या अभेद्य युतीसमोर भाजपचे ‘कमळ’ फुलणार का?”
अकलूज (प्रतिनिधी): माळशिरस तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांसाठी होत असलेली निवडणूक आता ‘काटे की टक्कर’ ठरत आहे.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निर्मितीमुळे जागांची संख्या कमी झाली असली, तरी राजकीय इर्षा मात्र शिगेला पोहोचली आहे. अनेक वर्षांपासूनचे राजकीय विरोधक असलेले मोहिते-पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात हातमिळवणी केल्याने निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
घराण्यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना रिंगणात उतरवले आहे:मोहिते-पाटील गट: मदनसिंह मोहिते-पाटील यांची सून वैष्णवीदेवी आणि मुलगा अर्जुनसिंह मोहिते-पाटील मैदानात आहेत.जानकर गट: आमदार उत्तमराव जानकर यांच्या पत्नी विमल जानकर आणि मुलगा जीवन जानकर निवडणूक लढवत आहेत.
भाजप:
माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांच्या रूपाने भाजपने मोठी खेळी खेळली आहे
.इतर दिग्गज: फत्तेसिंह माने-पाटील, सूर्यकांत माने-देशमुख आणि संग्रामसिंह जहागीरदार यांच्या कुटुंबातील सदस्यही रिंगणात असल्याने ही लढाई कौटुंबिक प्रतिष्ठेची बनली आहे.
जागावाटप आणि बंडखोरीचे सावट
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोंधळात माळशिरसमध्ये ‘स्थानिक आघाड्या’ वरचढ ठरत आहेत. मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत ९ पैकी ४ जागा राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि ३ जागा जानकर गटाला देण्यात आल्या आहेत,
तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना प्रत्येकी १ जागा सोडण्यात आली आहे.मात्र, शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमधील नाराजीमुळे काही ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढती होत आहेत.
निमगाव गणात ठाकरे गटाचे गोरख पवार हे महायुती समोर आव्हान उभे करत असल्याने आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोणाचे वर्चस्व राहणार?
तालुक्यात आजवर मोहिते-पाटील गटाचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. परंतु, गेल्या काही वर्षात भाजपने आणि जानकर गटाने आपली शक्ती वाढवली होती.
जानकर आणि मोहिते-पाटील एकत्र आल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
विभाग लढतीचे स्वरूप महत्त्वाचे उमेदवार
वेळापूर, मांडवे सरळ लढत मोहिते-पाटील विरुद्ध भाजप समर्थक.बोरगाव, निमगाव पंचरंगी/चौरंगी बंडखोर आणि अपक्ष निर्णायक.पिलीव चौरंगी राष्ट्रवादी (शप) विरुद्ध भाजप
प्रचाराचा धडाका आणि सोशल मीडियाचा वापर
प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने छुप्या बैठका, कॉर्नर सभा आणि होम-टू-होम प्रचारावर भर दिला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दुखवल्यानंतर थंडावलेला प्रचार आता पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. नाराज कार्यकर्ते आणि ‘गुपचूप’ प्रचार करणाऱ्यांची भूमिका यंदाचा ‘किंगमेकर’ ठरवणार आहे.
मोहिते-पाटील आपला गड राखणार की भाजप नवे समीकरण मांडणार, याचे उत्तर लवकरच मतपेटीतून स्पष्ट होईल.







