श्री अकलाईदेवी देवस्थान श्री क्षेत्र अकलूज येथे श्री शाकंभरी पौर्णिमा साजरी होणार
अकलूज (प्रतिनिधी)
श्री अकलाई देवी देवस्थान अकलूज. यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्री अकलाईदेवी मंदिरामध्येया वर्षी श्री शाकंभरी पौर्णिमा03जानेवारी रोजी साजरी होणार आहे.
तसेच दु. १२ वा ०५ मि. महाआरती होईल.देवीला भाजी भाकरीचा महानैवेद्य दाखविला जाईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन मंदिराचे कार्यकारी विश्वस्त जयसिंह शंकरराव मोहिते पाटिल यांनी केले आहे.






