अकलूज (प्रतिनिधी)


माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील निलेश देशमुख यांना सौर ऊर्जा , इलेक्ट्रिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल व त्यांनी सामाजिक कार्यामध्ये घेतलेल्या अथक परिश्रमाची दखल घेऊन पुणे येथील आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ पुणे येथील पत्रकार भवन येथे शनिवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सिने अभिनेत्री त्रिशा अहीरवाल यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
निलेश देशमुख हे माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथे राजवी ॲग्रो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यात इलेक्ट्रीकल मॅनेजर या पदावर कार्यरत असून त्यांनी लोकांना पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजना सौर ऊर्जेचे महत्व पटवून देऊन २०० हून अधिक कुटुंबांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळवून दिला आहे व सौर कृषी पंपामध्ये 1000 पेक्षा अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे तसेच सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना मानसिक ताणतणाव व शारीरिक व्याधीपासून दूर राहण्यासाठी ५० हून अधिक आर्ट ऑफ लिविंगच्या शिबिराचे आयोजन केले आहे त्यांचा प्रत्येक सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग असतो
यावेळी सिने अभिनेत्री त्रिशा अहीरवाल, सिने अभिनेत्री नमिता पोसम संस्थापक अध्यक्ष गणेश विटकर सचिव तेजस्विनी दिवटे इ.मान्यवर उपस्थित होते.






