डॉक्टरांनी विश्वासाहर्ता जपली पाहिजे -ऊदयसिंह पाटील
बावडा- (प्रतिनिधी )डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय करताना योग्य उपचार करुन रुग्णांना व्याधी मुक्त करणे गरजेचे आहे.सर्वसिमान्य रुग्णांच्या मनात डॉक्टरांविषयी आपुलकीची भावना निर्माण होते गरजेचे आहे.त्यासाठी सर्वच डॉक्टरांनी विश्वासाहर्ता जपली पाहिजे असे मत इंदापुर जि.पुणे येथील दुधगंगा दुध उत्पादक संघाचे मा.अध्यक्ष ऊदयसिंह विलासराव पाटील यांनी व्यक्त केले.

डॉ.सावन पालवे यांच्या रूद्रा डेंटल क्लिनिकचे उद्घाटन ऊदयसिंह विलासराव पाटील यांचे शुभहस्ते आणि सरपंच पुजाताई गिरमे,उपसरपंच रणजित आशोकराव घोगरे,बावडा येथील उद्योजक नवनाथ पवार,मनोज दादा जगदाळे, ग्रामसेवक अंबिका पावसे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले . त्यावेळी ऊदयसिंह पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी रविंद्र मामा जगदाळे,विठ्ठल घोगरे, किशोर घोगरे, रणजित फडतरे, डॉ.विभुते, डॉ.साळुंखे, डॉ.वाघमोडे,प्रमोद घोगरे, डॉ.श्रीकांत बांगर ,भिमराव नागरगोजे,सुनिल बांगर यांच्यासह नागरीक व पद्मावती शाँपिंग काम्लेक्समधील व्यापारी बंधु उपस्थित होते.
पुढे बोलतांना ऊदयसिंह पाटील यांनी ग्रामीण भागातील नागरीक वैद्यकीय ऊपचारांप्रती सकारात्मक झाले आहेत.चांगले वैद्यकीय व्यावसायाची शहरी भागाइतकीच ग्रामिण भागात ही गरज असल्याचे सांगितले.बावडा गावात दातांच्या उपचारासाठी डेंटिस्ट गरजेचे होते.ती ही उणीव डॉ.सावन पालवे यांनी रुद्रा डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून भरुन काढली.बावडा गावात प्रथमच दंत वैद्यकीय सेवा सुरु झाली असुन त्याचा फायदा बावडा गावांसह पंचक्रोशीतील नागरीकांना होईल अशी अपेक्षा ही यावेळी व्यक्त केली.
डॉक्टर सावन पालवे यांनी निरोगी दातांचे महत्व सांगत.नागरीक आपल्या दातांच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात.त्याचे गंभीर व दुरगामी परीणाम आपल्या शरीरावर होत असतो त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी निरोगी दात असणे गरजेचे आहे.दातांच्या आजाराकडे प्राथमिक अवस्थेत उपचार करुन घेतले तर भविष्यातील गंभीर आजार टाळले जावु शकतात असे सांगितले.






