• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,संशोधनाची आवड आवश्यक – सचिव विरसिंह रणसिंग

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 22, 2025
in शैक्षणिक
0
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,संशोधनाची आवड  आवश्यक – सचिव विरसिंह रणसिंग
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,संशोधनाची आवड आवश्यक – सचिव विरसिंह रणसिंग

कळंब ता. इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये सायन्स फेस्ट (Science Fest) चे आयोजन विज्ञान विभाग व बेस्ट प्रॅक्टिस कमिटी च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

सायन्स फेस्ट चे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख उपस्थिती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूर चे डॉ. राजेंद्र साळुंखे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती चे डॉ. विजय मोहिते व डॉ. विकास काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, विज्ञान विभागप्रमुख डॉ. सुहास भैरट, समन्वयक प्रा. राजलक्ष्मी रणसिंग तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे कसे वळावे याबाबत मार्गदर्शन केले.महाविद्यालयाची स्थापना करण्याच्या पाठीमागचा उद्देश स्पष्ट केला.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, नव्या संशोधन कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सैद्धांतिक ज्ञानास प्रत्यक्ष प्रयोगांची जोड देणे, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता,आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्यांचा विकास करणे या उद्देशाने या महाविद्यालयामध्ये दोन वर्षीपासून सायन्स फेस्ट सुरु केले असल्याचे सांगितल.

सायन्स फेस्ट मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान व पर्यावरणशास्त्र या विषयांवरील मॉडेल्स व प्रकल्प सादर केले. नवीकरणीय ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवरील प्रकल्प विशेष लक्षवेधी ठरले.विद्यार्थ्यांनी थेट प्रयोग करून वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.

पोस्टर प्रदर्शन मध्ये विविध वैज्ञानिक विषयांवरील माहितीपूर्ण पोस्टर्स विद्यार्थ्यांनी सादर केले.सायन्स फेस्ट मधील प्रकल्पांचे मूल्यमापन डॉ. राजेंद्र साळुंखे, डॉ. विजय मोहिते, डॉ. विकास काकडे तज्ज्ञ परीक्षकांच्या समितीद्वारे करण्यात आले. प्रकल्पातील नाविन्य, उपयोगिता, सादरीकरण आणि वैज्ञानिक स्पष्टता या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले.समारोप प्रसंगी उत्कृष्ट प्रकल्प व पोस्टर सादरीकरण केलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

उपक्रमामध्ये एकूण १०३ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वैज्ञानिक विचार आणि कल्पकता प्रभावीपणे सादर केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी अधिक रुची निर्माण झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सर्व उपस्थितांचे आभार मानले व कौतुक केले.सायन्स फेस्ट साठी तालुक्यातील नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन, कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली, श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर, एन ई एस हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज निमसाखर, एल.जी बनसुडे विद्यालय पळसदेव, केतकेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज निमगाव केतकी आणि विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर इत्यादी विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकानी सहभाग घेतला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
राष्ट्रवादीच्या विजयाने बुलेटची पैज अंगलट आली आता मोबाईल पण स्वीच ऑफ

राष्ट्रवादीच्या विजयाने बुलेटची पैज अंगलट आली आता मोबाईल पण स्वीच ऑफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In