पत्रकार शंकर काळे यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी) अकलूज येथील पत्रकार शंकर बबनराव काळे (वय 50 वर्षे )यांचे शुक्रवार दिनांक 19 /12 2025रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले .
त्याच्या पश्चात वडील,पत्नी,मुलगा, विवाहित मुलगी,जावई, सुन नातवंडे असा परिवार आहे.
ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांच्या निधनामुळे परिसरात शो क कळा पसरली आहे.अकलाई स्मशाभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्ययात्रेस समाजातील मान्यवर व पत्रकार उपस्थित होते






