अकलूज नगर परिषदेसाठी 69.22 टक्के मतदान.
अकलूज(प्रतिनिधी): अकलूज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया चालू असतानाच प्रभाग सात मधील भाजपाच्या उमेदवाराच्या पतीने मशीन आपटले यामुळे सुमारे तासभर गोंधळ उडाला.
एका बुथमधील ईव्हिएम काही वेळासाठी बंद पडली या दोन घटना वगळता सर्व निवडणूक शांततेत व उत्साहात पार पडली.
अकलूज नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीतसाठी १३ प्रभागातील ३९ बुथवर मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. परंतु कडाक्याच्या थंडी असल्यामुळे सुरुवातीच्या दोन तासात नागरिकांचा प्रतिसाद कमी होता. सकाळच्या पहिल्या दोन तासात ८.५९ टक्के मतदान झाले.











त्यानंतर मात्र नागरिकांचा प्रतिसाद वाढला मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. सकाळी मतदान सुरू झालेंनंतर काही वेळाने प्रभाग क्रमांक पाच मधील अकलाई विद्यालयामधील बुधवर वरील मशीन काही काळासाठी बंद पडली तर दुपारी प्रभाग ७ ब (स्वीमिंग टॅंक परिसर) मधील भाजपाचे उमेदवार अंकिता पाटोळे यांचे पती (उमेदवार प्रतिनिधी) अंबादास पाटोळे यांनी मशीनचे बटन बंद पडते म्हणून मशीन आपटल्याची तक्रार क्रांतिसिंह माने पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिली आहे.
यावर पोलिसांनी अंबादास पाटोळे यांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
सकाळी साडेसात ते दुपारी १.३० वाजेपर्यत १३ हजार २६१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ६ हजार ७७६ पुरुष व ६ हजार ४८१ महिला व इतर ४ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ३९.३० इतकी आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ९१०३ पुरुष, ९११९ महिला आणि इतर ०६ अशा १८२२८ मतदान झाले असून ५३.४२ टक्के मतदार झाले.मतदानाच्या अखेरच्या वेळेपर्यंत ५.३० वाजता 12161 पुरुष 11650 महिला इतर सहा अशा एकूण 23817 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला अकलूज नगर परिषदेत 69.22% मतदान झाले.







