डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची तोफ धडाडणार.तब्बल सात सभा
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषद ची निवडणूक आता रंगतदार वळणावर आली असून, प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाच्या नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली असून प्रचारात रंगत आली आहे.होम टू होम प्रचार सुरु आहे.प्रचाराची धुरा उर्वशीराजे मोहिते पाटील या संभाळीत आहेत.
त्यांच्या उत्स्फूर्त सहभागमुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला आहेत्यातच आता डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी प्रचारात उडी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI आठवले गट व लहुजी शक्ती सेना युतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ डॉ.श्री.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या गुरुवार दिनांक 27/11/2025 रोजी तब्बल सात जाहीर सभा होणार आहेत. सायंकाळी 5 :00 शिवापुर पेठ अकलूज, सायंकाळी 6 :10 रामायण चौक, 6 :50 सुतार नेट,रात्री 7 :30 पंचवटी, 8 :10 महर्षी कॉलनी इंदिरानगर,8 :50 विकास नगर, 9 :30 महादेव नगर, या सर्व ठिकाणी आदरणीय डॉ.श्री.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जाहीर सभा होणार आहेत.डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची तोफ धडाडणार असून प्रचारात रंगत येणार आहे.







