तिरवंडी कॅनल पट्टी ते वाघमोडे वस्ती, बंधारा रस्त्याचे निकृष्ट काम
माळशिरस (प्रतिनिधी) रणजितदादा गायकवाड माळशिरस तालुक्यातील मौजे तिरवंडी येथील कॅनल पट्टी ते वाघमोडे वस्ती, बंधारा रस्त्याचे निकृष्ट काम झाले असून, यासंदर्भात तिरवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल नारायण वाघमोडे यांनी यासंदर्भात सहाय्यक कार्यकारी अभियंता बांधकाम उपविभाग क्र.२, अकलूज यांना तक्रारी निवेदन दिले आहे.


सदर काम साधारणता १६ फेब्रुवारी २०२४ ला चालू झाले होते, काम चालू होऊन साधारण १२ ते १४ महीने झाले, कामाची अंदाजे सरकारी टेंडर नुसार रक्कम १,६०,००,०००/- (एक कोटी साठ लाख रुपये) येवढी आहे, तर सध्या कच्चा रस्ता तयार करण्यात आला असून, त्या वरती पातळ व निकृष्ट दर्जाच मटेरियल वापरण्यात आलेले आहे.सदर काम रणजिसिंह कंट्रक्शन कंपनी ने केले असून शासकीय अधिकारी यांचेशी संगणमत करुन कोनतेही सरकारी नियम न पाळता हे काम केलेले प्रथमदर्शनी दिसुन येत आहे.

या कामाला कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला असून, नागरिकांना पडलेल्या खड्ड्यांमुळे, उचकटलेल्या खडी मुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच वयोवृद्ध, शाळेतील मुलांना, शेतकरी वर्गाला, सतत ये जा करणा-यां नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या एका बाजूने साईड पट्टी देखील करण्यात आली नसून, एका बाजूला मुरूम ऐवजी काळी माती साईड पट्टीला बापरली आहे. रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसताना देखील ठेकेदाराने बिल काढले आहे.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत ची पूर्व परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीतील मुरूम उचलून रस्त्याच्या कामासाठी वापरला आहे.तरी संबंधित अधिकारी यांनी या कडे विशेष लक्ष घालून ८ ते १० दिवसात काम चालू करून, येणा-या पावसाळयाचे गांभीर्य लक्षात घेता १०० टक्के काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच संबंधीत कर्मचा-यावर व ठेकेदार यांचेवर कायदेशिर योग्य ती कार्यवाही करावी
.तसेच सदर काम लवकर पूर्ण झाले नाही तर कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदन देताना संदीपान वाघमोडे , बापूराव वाघमोडे , सुदर्शनभैया वाघमोडे , विठ्ठलराजे पाटील आदी लोक उपस्थित होते
सदर निवेदन च्या प्रति संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.







