*कृष्णानंद पाटील वस्ती येथे ध्वजारोहण संपन्न*
( माळशिरस ): रणजितदादा गायकवाड

शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती ता. माळशिरस जि. सोलापूर येथे 1 मे 2025 रोजी *”महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण”* संपन्न झाले.
विशेष म्हणजे ध्वजारोहण प्रशालेची प्रथम येणारी विद्यार्थिनी कु. तनिष्का तुषार गिरमे (इ. 9 वी अ) हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती सर्जेराव राजाराम कदम , स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य. ज्ञानदेव वाघ व साहेबराव वाघ प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक प्रताप तोरणे सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भानुदास आसबे सर तसेच तनिष्का गिरमे हिचे पालक तुषार गिरमे हे उपस्थित होते.
त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत याचे सार्वजनिक गायन करण्यात आले. तदनंतर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रताप तोरणे सर यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व महाराष्ट्र दिन व कामगार दिन का साजरा केला जातो हे थोडक्यात सांगितले. व अध्यक्ष निवड केली त्यास सहशिक्षक महादेव आठवले सर यांनी अनुमोदन दिले.
यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रशालेचे पर्यवेक्षक धर्मराज दगडे सर यांनी प्रशालेतील इयत्तावार निकालाचे वाचन केले. इयत्ता पाचवी ते नववी मधील इयत्ता निहाय विद्यार्थी संख्या व शेकडा निकाल याचेही सविस्तर वाचन केले. यानंतर सहशिक्षक संतोष अनगळ सर यांनी इयत्ता 9वी अ आणि 9वी ब मधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी यांच्या नावाची घोषणा करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते वही, कंपास पेटी व एक्झाम बोर्ड बक्षीस म्हणून देण्यात आले. विद्यालयात व नववी अ मधून प्रथम क्रमांक कु.तनिष्का तुषार गिरमे 78.83%, द्वितीय क्रमांक कु. श्रावणी दत्तात्रय काटकर 74.16%, तृतीय क्रमांक चि. सोहम रामदास चव्हाण 71.66%, तर इयत्ता 9वी ब मधून प्रथम क्रमांक कु. सानिया तानाजी नामदास 73.16%, द्वितीय क्रमांक कु. रुबीना उंबर शिकलकर 67.67%, तृतीय क्रमांक कु. अश्विनी अशोक करडे 67.50% तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025 या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राजक्ता विनोद गवसणे (इ. आठवी अ) या विद्यार्थिनीला 140 गुण मिळवून ती पात्र झाली त्याबद्दल तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर शाळेला अभिमान असलेले खेळाडू शिवराज हनुमंत भांगे (इ. 8वी अ) या विद्यार्थ्याने शालेय क्रीडा स्पर्धेत एअर पिस्तूल शूटिंग या खेळ प्रकारात विभाग स्तरावर सहभाग नोंदवल्याबद्दल तर पृथ्वीराज शामा चव्हाण (इ. 9 वी ब) या विद्यार्थ्याने कुस्ती या खेळ प्रकारात विभाग स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली याबद्दल दोन्ही खेळाडूंना प्रशस्तीपत्र व संस्थेकडून पाचशे रुपयाचा धनादेश देण्यात आला. तसेच प्राथमिक विभागातून इयत्ता पहिली दुसरी व तिसरी चौथी मधून प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर अध्यक्षीय भाषणात माननीय सर्जेराव कदम साहेब यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व विद्यालयाने मिळवलेले घवघवीत यशाबद्दल सर्वांचे कौतुक केले. व भविष्यातही असेच यश मिळवण्याचे प्रोत्साहन दिले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षिका पुष्पा चेमटे मॅडम यांनी केले. पूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.






