डॉ.स्मृतिका तावरे भोसले यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वैद्यकीय आघाडीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड..
पुणे.. दि.13 फेब्रुवारी रोजी डॉ.स्मृतिका तावरे भोसले यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वैद्यकीय आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीचे पत्र आमदार विक्रमजी काळे व एनसीपी वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी मुख्य संघटक डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.डॉ.स्मृतिका तावरे भोसले या बारामतीच्या असून डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेद महाविद्यालय,पिंपरी येथे स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या प्रमुख असून सामाजिक कार्यात सक्रिय असतात.त्यांनी गोर गरीब रुग्णांसाठी मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करून आरोग्य क्षेत्रात कार्यरत असतात.
त्यांच्या या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यसभा खासदार सुनेत्रावहिनी पवार यांनी अभिनंदन केले.







