श्रावणबाळ योजनेच वयोवृद्धाची होणारी हेळसांड थांबवण्याचे आदेश.
अकलूज: सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने व पदाधिकारी यांच्या वतीने ६/१/२०२५ रोजी श्रावण बाळ योजनेच्या वयोवृद्धाची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी, उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले होते, श्रावणबाळ योजनेच्या वयोवृद्धाना निवासी नायब तहसिलदार यांना समक्ष भेटणे बंधनकारक केल्याने श्रावणबाळ योजनेचे वयोवृद्ध महिला व जेष्ठ नागरिकांची हेळसांड होत होती ही हेळसांड थांबविण्याचे आदेश, उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज विजया पांगारकर यांनी दिले आहेत.






