. चाकोरे येथे गणेश जयंती उत्साहात साजरी
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
मारुती मंदिर चाकोरे या ठिकाणी श्री गणेश व श्री हनुमान या दोन्हीचा मूर्ती आहेत या ठिकाणी रोज भक्ती भावाने पूजा केली जाते गावातील युवकांकडून दर शनिवारी हनुमान चालीसा हनुमान स्तोत्र व महाआरतीचे आयोजन केले जाते पारायणे केली जातात. यावर्षी गणेश जयंती व शनिवार एकाच दिवशी असल्यामुळे या ठिकाणी महाआरतेचे आयोजन करण्यात आले होते गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी गावातील युवकांच्या सहभागातून महाप्रसादाचे नियोजन केले होते या महाप्रसादाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला अनेक भक्तांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. चाकोरे गावात राजकारण विरहित तरूणाई एकत्र येऊन व्यसनमुक्त. तंटामुक्त गाव स्वच्छ व सुंदर स्वावलंबी गाव निर्माण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात






