• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

देशाचे सुजाण नागरिक होण्यासाठी जीवनात संविधानाचे तत्व अंगीकारावे- डॉ. एम के इनामदार

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 26, 2025
in शैक्षणिक
0
देशाचे सुजाण नागरिक होण्यासाठी जीवनात संविधानाचे तत्व अंगीकारावे- डॉ. एम के इनामदार
0
SHARES
266
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*देशाचे सुजाण नागरिक होण्यासाठी जीवनात संविधानाचे तत्व अंगीकारावे- डॉ. एम के इनामदार*🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक त्या सर्वांना.. ज्यांनी भारत देश घडवला…* 💠🇮🇳💠🇮🇳💠🇮🇳💠🇮🇳💠

अकलूज – येथील सदाशिवराव माने विद्यालयात देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय कार्यक्रमाचे ध्वजारोहण अकलूजचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम के इनामदार यांच्या शुभहस्ते व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे संचालक बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, प्रशाला समितीचे सदस्य इक्बाल काझी, आप्पासाहेब मगर, ॲड. रणजित माने-देशमुख, मुख्याध्यापक अमोल फुले, माता पालक, शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत सादर केले. यास विद्यालयाच्या सयाजीराजे वाद्य वृंदाने उत्कृष्ट संगीतमय साथ दिली. तदनंतर बँडपथकाच्या तालासुरात विद्यालयाच्या एनसीसी, आरएसपी, स्काऊटच्या पथकांनी नेत्रदिपक असे संचलन केले. या संचलानाचे नेतृत्व पथक प्रमुख इशांतराजे देशमुख, पायलट प्रमुख सुज्योत पंडित, ओम गायकवाड यांनी केले. संचलनानंतर विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक सामुदायिक कवायतीचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापकांनी केले. त्यांनी सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन त्याचे महत्व विषद केले. पुढे बोलताना यावर्षी विद्यालयाने कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक सह विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केली असून सर्वत्र उज्वल यश संपादन केले असल्याचे सांगितले.यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे व बक्षीसांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण, रजत, कास्य पदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पदकांचे वितरण केले. यानंतर संग्रामसिंह मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद व प्रथम क्रमांक आलेल्या मुला-मुलींच्या संघांना श्रीकांत राऊत यांनी प्रत्येकी रोख १००० रु.चे बक्षीस दिले. तसेच भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीचे व प्रमाणपत्राचे वितरण केले. भूगोल उपक्रमशील मुख्याध्यापक अमोल फुले व उपक्रमशील शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेल्या सहशिक्षिका लक्ष्मी अस्वरे यांना ट्रॉफीचे वितरण करून सन्मानित करण्यात आले. विशेष सन्मानामध्ये मुंबई येथे झालेल्या राज्याच्या पथसंचलनात सहभागी झालेला विद्यालयाचा माजी एनसीसीचा विद्यार्थी आदित्य निंबाळकर यास सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे व लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण केले. सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. इनामदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संविधानाचे महत्त्व सांगून देशाचे सुजाण नागरिक होण्यासाठी संविधानाचे तत्व अंगी बाळगावे. आपली आवड ओळखून ध्येय गाठावे. आधुनिक युगात अनेक क्षेत्रात संधी असून तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचा विकास करावा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची ओळख करून त्यांना प्रोत्साहन द्यावे. असा मौल्यवान सल्ला दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संचलन, सामुदायिक कवायतीचे, सांस्कृतिक गीताचे, लेझीमचे कौतुक केले. या कार्यक्रमास रात्र शाळेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य जाकीर सय्यद, भारत शिंदे, पर्यवेक्षक उमेश बोरावके, धनंजय मगर, भीमाशंकर पाटील, शिक्षक प्रतिनिधी संजय जाधव, राजाराम काळे, प्रमिला राऊत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ, बहुसंख्य पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट पवार व स्मिता दळवी यांनी केले. कार्यक्रमांची सांगता ‘सारे जहाँ से अच्छा’ या देशभक्तीपर गीताने झाली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने शेवट गोड करण्यात आला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
सद्गुरु श्री श्री कारखान्यावर प्रजासत्ताक दिन साजरा

सद्गुरु श्री श्री कारखान्यावर प्रजासत्ताक दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In