श्रीपूर सेक्शन 15ते नेवरे या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम अकलूज (रणजितदादा गायकवाड )सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील रा. मा 145ते महाळुंग श्रीपूर सेक्शन 15ते नेवरे या प्रजिमा क्र. 118.अंदाजे 8किलोमीटर रस्त्याची सुधारणा करण्याचे आठ कोटीचे काम 2022-2023च्या अर्थसंकल्प बजेट मध्ये 5054मार्ग व पूल 04मधून मंजूर करण्यात आले होते.सदर कामाची ई निविदा कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग अकलूज यांनी सूचना क्र -12सन 2023-2024.जा. क्र. सा. बा. वि. अकलूज निविदा 3863-2023ही 13-10-2023रोजी काढली होती. सदर निविदा 3-1-2024रोजी कार्यालयात उघडण्यात आली.त्यानंतर निविदा -688सन 2024अन्वये 8-2-2024रोजी माळशिरस तालुक्यातील कोंढारपट्टा येथील अमित कंट्रक्शन या कंपनीला कार्यादेश देण्यात आला.

त्यानंतर बारा महिन्याच्या आत उप अभियंता सा. बां. उप विभाग क्र -3यांच्या देखरेखी खाली सदर काम पूर्ण करावयाचे होते.सदरचे काम पूर्ण करण्याची मुदत अवघ्या एक महिन्यात संपत आहे. त्यामुळे सदरचे काम गेल्या आठवड्यात सुरु करण्यात आले असून ते काम घाई गडबडीत पूर्ण करण्यात येत असून अतिशय निकृष्ट पणे काम सुरु आहे.
अद्याप रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु काम सुरु असतानाच रस्त्यावरील डांबर व खडी उचकटली आहे. वाहन पुढे गेले की पाठीमागे कार्पेट उरकलं जात आहे त्यामुळे भविष्यात हा रस्ता किती दिवस तग धरणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.सदर रस्त्याचे काम सुरु झाले आहे.परंतु, या कामांचा दर्जा निकृष्ट असून, त्यात भ्रष्टाचार होत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे,यां रस्त्याच्या कामाची चौकशी क्वाॅलिटी कंट्रोल विभागाकडून करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रस्ता तयार करताना प्रथम आवश्यक ते खोदकाम करून त्यामध्ये चार इंच जाडीच्या दगडांचा अर्धा फूट थर टाकून त्यावर थोडा मुरूम टाकून रोड रोलरने दबाई करावी लागते. नंतर त्यावर खडी चा थर टाकण्यात येतो, परंतु, चांगल्या रस्त्यावर मशीनने रंगरंगोटी सुरू आहे.ज्या ठिकाणी गरजच नाही अशा ठिकाणी डांबरीकरण चालू आहे ते कुणासाठी ठेकेदारासाठी हे अधिकाऱ्यांसाठी हा प्रश्न निर्माण होतो.असे असताना ठेकेदारांनी अंदाजपत्रकानुसार कोणतेही मापदंड वापरण्यात आले नाही. त्यात चार इंच जाडीच्या दगडांच्या अर्धा फुटाच्या थराला बगल देण्यात आली असून, कार्पेट ची जाडी किती आहे हा खूप मोठ्या संशोधनाचा विषय आहे.
या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे . त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारासहित त्यावर सुपरव्हिजन करणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामासंदर्भात लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.
त्याचप्रमाणे सदर काम नियमानुसार व्हायला हवे. विकासकामांसाठी शासन करोडो रुपये खर्च करते. मध्येच रस्ता उखडला गेल्यास सर्वसामान्यांचा घामाचा पैसा पाण्यात जातो. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. रस्त्याचे काम चांगले झाले नाही यामुळे रस्त्यावरून ये -जा करणे जिकिरीचे ठरणार आहे
.हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे या रस्त्यावर नागरिकांना शाळेतील विद्यार्थी यांना येता जाता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.साईट पट्या व्यवस्थित भरण्यात आल्या नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा रस्ता वर्दळीचा असून या मार्गाने नागरिक यांची नेहमी ये-जा सुरू असते. त्यामुळे संपूर्ण रस्ता मजबूत होणे अत्यावश्यक होते. कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याने लागलीच रस्त्यावरील डांबर उघडणे, रस्ता खचणे, खड्डे निर्माण होणे असे प्रकार होणार आहेत. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले नसल्याने हा रस्ता पुढे किती दिवस तग धरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच डांबरीकरण रस्त्याला माती मिश्रीत मुरुम टाकण्यात आला.हवे तसे मजबुतीकरण केले नाही. डांबरच निकृष्ट दर्जाचे व अत्यल्प वापरल्यामुळे हा रस्ता टिकणारच नाही अशी शंका निर्माण झाली आहे.त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी या कामाची चॊकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी होत आहे.
चौकट :-यासंदर्भात संबंधित अधिकारी यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी नकार दिला.






