*कृष्णानंद विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा* अकलूज (प्रतिनिधी )शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती-अकलूज येथे रविवार दिनांक 26 जानेवारी, 2025 रोजी *भारतीय प्रजासत्ताक दिन* उत्साहात साजरा करण्यात आला.




सर्व विद्यार्थी शिक्षक यांची प्रभात फेरी काढण्यात आली. याप्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रम स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती सर्जेराव राजाराम कदम साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य. वेताळ घुले साहेब. ज्ञानदेव वाघ साहेब, वेताळ काटकर साहेब, साहेबराव वाघ, रणजित गायकवाड पत्रकार साहेब,. राजन एकातपुरे सर. शितोळे आण्णा,आडगळे वहिनी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भानुदास आसबे सर हेही उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, व ध्वजगीत गायन करण्यात आले व भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी विद्यालयातील स्काऊट व गाईड टूपचे अतिशय शानदार असे संचलन मोरे मॅडम व गुरव सर व सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली करत कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्जेराव कदम साहेब यांनी दोन्ही ग्रुपची मानवंदना स्वीकारली.
यानंतर घोष पथकाच्या तालावरती सर्वच विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व एक सूत्रीपणाने सामुदायिक कवायत सादर केली. यानंतर विद्यालयातील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना सहशिक्षक ढोले सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिंडी हे गीत सादर केले. या गीतासाठी आठवले सर, धाईंजे मॅडम, देशमुख मॅडम चेमटे मॅडम, चिंतामणी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी हलगीच्या तालावर लेझीम चे बहारदार सादरीकरण केले व प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांना अनगळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्राथमिक विभागातील कु. श्रुतिका पांडोळे, कु. जान्हवी माने, (4 थी )कु. पायल साळुंखे (6 वी ) कु. सृष्टी माने (7 वी ) यांनी आवेशपूर्ण भाषण करून भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी कृष्णानंद सोशल फाउंडेशन च्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीतील प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना वही, कंपास, पेन व प्रशस्तीपत्र यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच द ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या वातीने घेतलेल्या निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात माननीय .सर्जेराव कदम साहेब यांनी सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या . त्यानंतर “सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा” या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक संतोष अनगळ सर यांनी केले.






