सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त बागेची वाडी ग्रामपंचायत व ग्रामीण रुग्णालय बागेची वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरास सुरुवात
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड




बागेची वाडी गावचे लोकप्रिय सरपंच कृष्णराजभैया माने पाटील व गावचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक अलमगिर शेख यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली बागेचीवाडी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बागेचीवाडी गावातील जनतेसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.हे शिबिर सलग तीन दिवस गावातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी राबविण्यात येणार आहे
या शिबिरामध्ये मोफत रक्ताच्या सर्व तपासण्या डोळ्यांच्या सर्व तपासण्या गरजूंना मोफत चष्मा वाटप कंस वाटी मसाज सेंटर कडून मसाज तसेच इतर आजारांवर तज्ञांमार्फत मोफत उपचार केले जात आहे
दिनांक 23 जानेवारी रोजी गावातील जवळपास 600 पेक्षा जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला धावपळीच्या या युगात गावातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी हे शिबिर गावातील तीन ठिकाणी सदर तीन दिवस आयोजित केले आहे असे गावचे सरपंच कृष्णराज भैय्या यांनी सांगितले.
दिनांक 24जानेवारी कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती शाळेवर तर दिनांक 25 जानेवारी या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय बागेची वाडी या ठिकाणी शिबिराचे पुढील टप्पे होणार आहेत
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी गावच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेणारे हंसराजभैया माने पाटील उपसरपंच रियाज शेख अँड वीरेंद्र वाघमारे जितेंद्र शिंदे नामदेव माने सुधीर पवार जी. प. शाळा बागेचीवाडी चे मुख्याध्यापक गायकवाड सर हेही यावेळी आवर्जून उपस्थित होते
आरोग्य केंद्राचे डॉक्टर जाधव साहेब आरोग्य केंद्राच्या सेविका आशा सेविका ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतचे कर्मचारी हे परिश्रम घेताना दिसत आहेत
सरपंच व ग्रामसेवक यांच्या कल्पकतेतून गावात अनेक उपक्रम राबवले जात आहेत वृक्षारोपण स्ट्रीट लाईट ओपन जिम अंतर्गत रस्ते बंदिस्त गटारी याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जात आहे






