*कळंब च्या ता इंदापूर, जिल्हा. पुणे वालचंद विद्यालयात HSC विद्यार्थ्यांचा चा निरोप समारंभ उत्साहात* *पार पडला*
ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब. ता. इंदापूर, जिल्हा. पुणे,येथे इयत्ता 12 वी च्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रसंगी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय रामचंद्र कदम साहेब, उपाध्यक्ष मधुकर जी पाटील साहेब, विद्यालयाचे प्राचार्य सुरेश अर्जुन सर, पर्यवेक्षक आळंद सर, जूनियर विभाग प्रमुख सावंत सर, माझी प्राचार्य सर्व गोड सर, विद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत निरोप समारंभ पार पडला. प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली अनेक विद्यार्थी बारावीचा निरोप घेताना भावुक झाले, इयत्ता बालवाडी ते बारावीपर्यंत चे सर्व शिक्षण वालचंद विद्यालयांमध्येच घेतलेले अनेक विद्यार्थी निरोप समारंभाच्या वेळी विद्यालयातून निरोप घेण्याच्या वेळी भाऊक झाले, विद्यार्थ्यांमध्ये चेतन खैरे, पियुष आवळे, प्रियंका कदम, समीक्षा कीर्दक, वृषाली ठोंबरे, प्रिया लोहार, सानिका कांबळे, अशा इतरही अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली
विद्यार्थ्यांनी आपल्या असणाऱ्या लहानपणीपासूनच्या इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व आठवणी शिक्षकांबद्दलची त्यांची मते शाळेतील अनेक आठवणी, मित्रा मैत्रिणी याबद्दलच्या अनेक आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. प्रसंगी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र दादा कदम यांनी येणाऱ्या 2025 च्या एच एस सी परीक्षेला सामोरे जाताना धीटपणे सामोरे जाऊन आपले आपले आई-वडिलांचे आपल्या गुरुजनांचे आपल्या शाळेचे आपल्या गावाचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या, तसेच आपल्या विद्यालयातून 65 ते 70 विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगून पोलीस प्रशासन, असो, वकील क्षेत्र असो, डॉक्टर इंजिनीयर, अशा अनेक क्षेत्रात आपल्या विद्यालयातील विद्यार्थी कार्यरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा हिप्परकर मॅडम यांनी केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम ठोंबरं यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनीषा रेडेकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाबाबतची सर्व माहिती प्राध्यापक सागर पवार सर यांनी दिली. एकूणच सर्व कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.







