माणुसकीनं-स्नेहानं माणसं कमवलेला माणूस – आण्णासाहेब….
*श्री. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज*(महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त)
ग्रामीण भागातील एक छोटासा मुलगा आपल्या वडीलांबरोबर गेली दहापंधरा दिवस जूने सुमित्रा मोटर्स येथे आण्णासाहेबांना भेटण्यासाठी येत होता. परिस्थिती हालाखीची, गरीब अठरा विश्व दारिद्रय घरी. कष्ट केल्यावरच दररोजचे जेवण भेटत होते. पोटच्या गोळ्याचे नाक व ओठ निम्मे तुटलेले त्यासाठी डॉक्टरने मोठा खर्च सांगितला होता पण ते शक्य नव्हते. कुणीतरी सांगितले आण्णासाहेब यांना भेट म्हणून. भेट झाली सर्व हाकीगत ऐकून अंगावर काटा आला. आण्णासाहेब यांनी ताबडतोब मुलाच्या ऑपरेशनसाठी सर्व मदत केली. दुसरे उदाहरण म्हणजे एका म्हाताऱ्या आईला दोन मुले कोणीही सांभाळ नव्हते. म्हातारी आई आण्णासाहेब यांच्याकडे तक्रार घेऊन आली. सर्व ऐकून घेऊन दोन्ही मुलांना बोलावून समजून सांगितले, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. नंतर दोन्ही मुलांनी आईला घेऊन गेले.
खरेतर अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड या दोन सुप्त गुणांनी सुशोभित असलेले आण्णासाहेब यांची भेट झाली की कसलेही काम असूद्या झालेच म्हणून समजा….. एक मृदू स्वभावाचा, मोजकं आणि अर्थपूर्ण बोलणारा, बोलण्यापेक्षा कृतीतून परिणामकारक संदेश देणारा, आपल्या निर्णयाचे दूरगामी परिणाम लोकांवर काय होतील, हे तर्काने अगोदरच जाणणारा आणि टिकाटिप्पंनीकडे दुर्लक्ष करून आपले काम शांतपणे एकाग्रतेने करीत राहणारा एक प्रगल्भ मनुष्य म्हणजे आपले संग्रामसिंह मोहिते पाटील तथा आण्णासाहेब.
वीरतेने कर्म करतो तो “कर्मवीर” अथवा कर्मामध्ये विरतेला जपतो तो “कर्मवीर” शूर तोची… वीर तोची… या कवितेत म्हटल्याप्रमाणे ग्रामीण उपेक्षित भागात रक्ताच्या पाण्यात चंदनाची हाडे उपेक्षेच्या कठोर सहाणेवर झिजवणाऱ्या या माणसाने स्वतः पडद्यामागे राहून अनेक लोकांना मदत, सहकार्य, समाजकारण केले. कधीच प्रसिद्धीच्या झोतात न राहता, कुठलाही परकेपणा, ओळखीचा, आपला, दूरचा न पाहता जो भेटेल त्यांचे काम करतात. आपल्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूज मध्ये सदस्य, उपसरपंच आणि सरपंच पद भूषवून अकलूजच्या विकासाला गती देऊन चेहरा मोहरा बदलून टाकला.
स्वतःचे घर असावे प्रत्येकाचे स्वप्न असते अकलूज मधील गरीब कष्टकरी कामगारांचे हे स्वप्न घरकुलाच्या माध्यमातून अण्णासाहेबांनी पूर्ण केले झोपडपटीत लाईट पाणी रस्ता सुविधा दिल्या पिण्यासाठी स्वच्छ पाणी घरपोच वाटर सप्लाय च्या माध्यमातून दिले अशी अनेक कामे केली. सर्वात मोठे काम म्हणजे ग्रामपंचायत मधील कामगारांचा पगार वाढवला कारण समाधानी कामगार चांगले काम करू शकतो. ग्रामीण भागातील मुलांना खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे म्हणून आद्ययावत इंडोर स्टेडियम उभारले. इनोव्हेशन आणि इनोव्हेशन या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांना मारून मुटकून शिकवून जमत नसतात. त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने अटल टिंकरिंग लॅब उभा केल्या. बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होण्यासाठी लेझीम, केंद्र व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, बुद्धिबळ, कब्बडी, बालक्रीडा स्पर्धा, आट्यापाट्या स्पर्धा कुस्ती स्पर्धा व शालेय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.
सामाजिक बांधिलकी जपत 2003 पासून मित्र मंडळाच्या साह्याने रक्तदान शिबिर आयोजित करून हजारो लोकांना संजीवनी दिली आहे. कोरोनाचा कालखंड असेल किंवा महापूर असेल सामाजिक बांधिलकी जपत हजारो कुटुंबांना आधार देऊन मदत केली…..वाह वाह करणाऱ्या शेकडो व्यक्तिंपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्याला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी पुरून उरते. मोठ्या मनानं आणि सढळ हातानं कौतुक करणारं. आढेवेढे न घेता सरळ बोलणं..तोंडावर स्पष्ट बोलणं..असं लोकविलक्षण नेतृत्व म्हणून आण्णासाहेबांची या पंचक्रोशीत ख्याती आहे,कित्येक गोरगरीब,गरजूंना, विद्यार्थ्यांना निःस्वार्थपणे आजवर यथासांग केलेली मदत-सहकार्य सर्वश्रुत आहे.
निःस्वार्थ सत्कार्य हीच आण्णासाहेबांची ओळख जनसामान्यांमध्ये दृढ आहेत. माणुसकीनं-स्नेहानं माणसं कमवावी लागतात. कित्येकांच्या समस्येवर आण्णासाहेबांनी आपुलकीनं मात केली. मूर्तीच्या स्वरूपातल्या देवापेक्षा देवत्वाचा प्रत्यय देणारी माणसं पूजनीय वाटतात. आदरणीय आण्णासाहेबांना ते उद्दिष्ट थोरामोठ्यांच्या आशीर्वादानं-मार्गदर्शनानं लाभलंय-गवसलंय..! अशा आपल्या माणसातल्या असाधारण माणसास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… …प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज9226144836(लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)







