बागेचीवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष माळशिरस तालुका समन्वयक रणजितदादा गायकवाड यांच्या घरी आमदार श्री राम सातपुते यांची सदिच्छा भेट …

माळशिरस (रणजितदादा गायकवाड )मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष माळशिरस तालुका समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते रणजितदादा गायकवाड यांच्या बागेचीवाडी येथील घरी भारतीय जनता पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार रामभाऊ सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना सातपुते म्हणाले की या निवडणुकीत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे ते बेछूट आरोप करत सुटले आहेत त्याउलट आपण गेल्या पाच वर्षांत रस्ते पाणी वीज या पायाभूत सुविधांच्या बाबतीत तालुक्या हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून सदरची कामे पूर्णत्वास येताहेत . जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो व्यक्ती माझ्यापर्यंत येईल त्याचे कोणतेही काम आसो ते केलय.
म्हणून या वेळेस राहिलेली काही विकासकामे मार्गी लावण्यासाठी व तरूणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहत मंजूर करून घेण्यासाठी कमळ या चिन्हासमोरील बदन दाबून बहुमताने निवडून द्या. असे आवाहन केले.
यावेळी बहुसंख्येने तरूण उपस्थित होते







