माळशिरस विधानसभा मतदारसंघात माजी सनदी अधिकारी शैलेश कोतमिरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल *
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड*
माळशिरस 254 अ.ज.विधानसभा मतदार संघात मुळचे हिंन्दू खाटीक समाजाचे माजी सनदी अधिकारी शैलेश कोतमिरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज साध्या पद्धतीने दाखल केला
कोतमिरे यांच्या उमेदवारी मुळे महाविकास आघाडी व महायुती दोघांचीही तारांबळ होणार आहे हे नक्की त्यांच्या उमेदवारीला सर्वच स्तरातून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे
एक सुशिक्षित व चारित्र्यसंपन्न तसेच शासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेला व्यक्ती तसेच तालुक्यातील लोकांना आपल्या हक्काचा माणूस मिळेल अशी जोरदार चर्चा माळशिरस परिसरात होताना दिसत आहे
शैलेश कोतमिरे यांनी 33वर्ष प्रशासकीय सेवेत घालवली आहेत ते माळशिरस तालुक्यातील सर्वांनाच न्याय मिळवून देतील असा विश्वास व्यक्त होत आहे







