आर.आर (आबा)पाटिल सुंदर गाव स्पर्धेत माळशिरस तालुक्यातुन बागेचीवाडी गावचा प्रथम क्रमांक
संघर्ष योध्दा-माळशिरस- प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड आर आर आबा पाटिल सुंदर गाव स्पर्धा २०२२-२३ चे सोलापूर जिल्ह्यातील निकाल २आक्टोंबर गांधी जयंतीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्रभारी उपायुक्त कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी तालुका निहाय प्रथम क्रमांकाची यादी जाहिर केली यामध्ये माळशिरस तालुक्यातील अग्रगण्य बागेचीवाडी या गावाने माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला
गावचे लोकप्रिय सरपंच कृष्णराजभैय्या माने पाटील.कर्तव्यदक्ष ग्रामसेवक ए आर शेख सर्व सदस्य व कर्मचारी यांच्या आचुक उत्कृष्ट नियोजनामुळे हे शक्य झालं आहे सुंदर गाव स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक एक सदस्य बचत गट यांना ७ ते ९ आक्टोंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील त्रिवेणी आश्रम मरकळ येथे आदर्श गाव कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे
चौकट *
यावेळी बोलताना सरपंच कृष्णराजभैय्या म्हणाले की हा पुरस्कार मिळण्यात गावचे उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक कर्मचारी व गावातील जागरूक नागरिक यांचा महत्वाचा वाटा आहे सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे तसेच यावरच समाधान न मानता इथुन पुढे आसेच कार्य करत राहू व देशपातळीवर गावचे नाव चमकवायचा प्रयत्न सुरूच राहील*






