“माढा (प्रतिनिधी )मानव सुरक्षा सेवा समिती महाराष्ट्र राज्य” माढा तालुका येथील महिला टिम आणि पुरुष टिम च्या वतीने ” जिल्हा परिषद आदर्श प्राथ.शाळा उंदरगाव, ता. माढा” येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती आणि जागतिक अहिंसा दिन, जागतिक कृषी प्राणी दिन, राष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त मानव सेवा समिती सदस्यांच्या संकल्पनेतून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.







यात जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर कापसे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमाचं पूजन करून, उपस्थित मान्यवर चे स्वागत करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याद्यापक श्री कापसे सर यांनी केले
,मानव सुरक्षा सेवा समिती चे माढा तालुका अध्यक्ष सोपान चंद्रकांत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मानव सुरक्षा सेवा समिती मुख्य उद्देश स्त्री भ्रूण हत्या रोखणे, बाल मजुरी थांबवणे, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, दारूबंदी याला आळघालणे, अनाथ बालकांना बालक आश्रम, अनाथ आश्रम स्थापन करून त्यांना सोय उभे करून देणे, थोर पुरुषांच्या जंयती व राष्ट्रीय एकता एकात्मता टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणे, शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे उंदरगाव मध्ये सर्व राष्ट्रीय महापुरुषांच्या जंयती निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प घेतला
तसेच ॲड. गणेश मोहन चव्हाण यांनी आपल्या मनोगतामधुन महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री आणि मानव सुरक्षा सेवा समिती व यापुढील समितीची वाटचाल याबद्दल विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी कापसे सरांनी सर्व समिती चे उपक्रम विषयी कौतुक केले व सर्वांना एकत्रित स्वच्छतेविषयी संकल्प प्रतिज्ञा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी मानव सुरक्षा सेवा समिती महाराष्ट्र राज्य सदस्य उपस्थित माढा तालुका अध्यक्ष सोपान चंद्रकांत चव्हाण, शितल निरंजन देशमुख, ॲड. गणेश चव्हाण,मा विजय शिंदे (पत्रकार) सुशांत गायकवाड, औदुंबर पवार, संगीता नाईकवाडे, श्रीदेवी आरे,कुसुम नाईकवाडे, मोहिनी पारडे, माधुरी नाईकवाडे, जयश्री कासार, रूपाली चव्हाण उपस्थित होते.





