मुलीचा विवाह जमल्या प्रित्यर्थ वृक्षारोपण






अकलूज (प्रतिनिधी )माळेवाडी, अकलूज येथील अंगणवाडी च्या शिक्षिका सुजाता संदीप शहा यांची मुलगी सोनाली हिचा विवाह आदित्य इंद्रजित शहा यांच्या सोबत जमल्या प्रित्यर्थ मुलीचे आई -वडील, तसेच जावई, इतर सर्वं नातेवाईक यांच्या वतीने ग्रामीण कृषि पर्यटन केंद्र चिंचणी येथे वृक्षारोपण करून एक वेगळा पायंडा पाडला. व सामाजिक बांधिलकी जोपासली.
नवीन वैवाहिक जीवन सुरु करायच्या पूर्वीच वृक्षारोपण करून एक आगळा वेगळा संदेश दिला.याप्रसंगी जीवनधर वालचंद शहा,अरुणा शहा,इंद्रजित शहा,वर्षा शहा,सागर शहा, अनिता शहा,डॉ. राजेश शहा,प्रमिला शहा,सागरिका शहा,आकांक्षा शहा यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.दरम्यान या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकुले,बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड,पंचायत समिती चे विस्तार अधिकारी सुरज वासूदेव , पर्यवेक्षिका शामल कुलकर्णी,बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात, यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.अंगणवाडी मदतनीस सुनीता मधुकर खाडे यांनी विशेष सहकार्य केले.






