अकलूज मध्ये राजेंद्र राऊत याच्या प्रतिमेला प्रतिकारात्मक जोडेमारो आंदोलन !अखंड मराठा समाजाचे तीव्र निषेध आंदोलन
माळशिरस तालुका प्रतिनिधी – रणजितदादा गायकवाड
मराठा संघर्ष योध्दा श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणार्या बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत याच्या मराठा समाजाविषयी मांडलेल्या भूमिकेला विरोध म्हणून राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला अकलुज येथे महर्षी चौकात अखंड मराठा समाज माळशिरस तालुक्यातील मराठा बांधवांकडून जोडेमारो आंदोलन करत लढेंगे जितेंगे हम सब जरांगे, एक मराठा कोटी मराठा, सुपारी बहाद्दर राजा राऊताच करायचं काय खाली मुंड वर पाय , भामट्या अण्णा शिंदेच करायचं काय यांसारख्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला आणि अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाच्या अनपेक्षित वक्तव्य सोशल मीडियाद्वारे करून भावना दुखवले प्रकरणी त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली
यावेळी बोलताना मराठा समाजातील युवकांनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना इशारा दिला आहे की इथुन पुढे जर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाज व मराठायोध्दा श्री.मनोजदादा जरांगे-पाटील यांच्या विरोधात व्यक्तव्य टाळावे अन्यथा त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मराठा समाज बांधव तुमचा सुफडा साफ केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी बोलताना भान ठेवून बोलावं नसता तर होणार्या परिणामाला सामोरे जावे लागेल. असा इशारा देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते सदर आंदोलन शांततेत करण्यात आले व यावेळी पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.






