अकलूज येथे 19सप्टेंबर रोजी मोफत डोळे, नेत्ररोग व मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथे गुरुवार, दिनांक- १९/०९/२०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत शिव फाउंडेशन व शिवशक्ती क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे, नेत्ररोग व मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन केल्याची माहिती आयोजक डॉ. विश्वजीत सावंत यांनी दिली.
या शिबिरात मोफत डोळे तपासणी,मोफत व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया,अल्प दरात चष्मे वाटप,डोळ्यांतील मांस काढणे मोफत शस्त्रक्रिया,डोळ्यांवरून सुजकरिता मोफत इंजेक्शन,डोळ्यांतील तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिया,मोफत साखर (मधुमेह) तपासणी, इत्यादी तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहेत.
शिबीरास येताना रेशन कार्ड व आधार कार्ड सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे.सदर शिबीर हे शिवशक्ती क्लिनीक, विजय मेडिकल डॉ. एच.व्ही देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या विशेष सहकार्यातून होणार आहे.सदर शिबीर 19सप्टेंबर रोजी सकाळी 9ते दुपारी 2या वेळेत जुना पंढरपूर रोड, महर्षी कॉलनी, दत्त मंदिर जवळ, शिवशक्ती क्लिनीक, अकलूज या ठिकाणी होणार आहे.
परिसरातील जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






