अकलूज दि.१० (प्रतिनिधी)एक वडाचे झाड लाकूडतोड्या तोडत असताना या वटवृक्षातून श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्षातून प्रकट झाले आहेत हा हालता देखावा संग्रामनगर- अकलूज येथे सौ.स्वाती विशाल नवगन व सौ.कविता राजकुमार नवगन यांच्या घरी महालक्ष्मी समोर हालता देखाव्याची सजावट केली आहे.हा देखावा पहाण्यासाठी महिलांनी खूप गर्दी केली होती.
सध्या देशात व राज्यात वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात चालू त्यामुळे मोठ मोठी वृक्ष जमीनदोस्त झाली असल्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे कमी होत चालले आहे.हि वटवृक्षाची तोड थांबविण्यासाठी नवगन परिवाराने यांनी या देखाव्यातून दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
(छाया:-केदार लोहकरे अकलूज)






