विनापरवाना वृक्ष तोडल्यास अकलूज नगरपरिषद करणार ५००००/- दंड
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषद हद्दितील सर्व नागरिकांना अकलूज नगरपरिषद च्या वतीने मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी आवाहन केले असून दिनांक ६ सप्टेंबर २०२४ चे महाराष्ट्र शासनाचे महसुल व वन विभागाचे सुधारीत अध्यादेशानुसार विनापरवाना वृक्षतोड केल्यास अथवा झाड मारून टाकणे / नाश करणे उद्देशाने झाड जाळणे किंवा कापणे किंवा छाटणे किंवा बुंध्या भोवतालची सोल कोरणे (गर्डलींग) किंवा झाडाची साल काढणे या प्रकारची कृती विनापरवाना केल्यास त्यास पन्नास हजार रकमेपर्यंतचा दंड लागू केलेला आहे.
तरी शहरातील सर्व नागरिकांनी नगरपरिषदेची रितसर परवानगी न घेता वृक्षतोड अथवा वृक्ष नाश करणेचे उद्देशाने कुटलीही कृती केल्यास रु.५०,०००/- पर्यंतचा दंड आकारणेत येईल याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.
असे आवाहन अकलूज नगरपरिषद अकलूज चे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.






