*डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने वृक्षारोपण
माळशिरस (प्रतिनिधी ) रणजितदादा गायकवाड
डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता. अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी मौजे मळोली (ता. माळशिरस) येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम संपन्न झाला.
‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या तुकोबारायांच्या वचनानुसार वृक्षच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असून प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामाजिक स्वच्छतेसोबतच वृक्षारोपण, व वृक्षसंवर्धन करून सामाजिक बांधीलकी जपण्यात येत आहे.
मौजे मळोली गावाच्या पूर्वेस मळोली ते शेंडेचिंच या रस्त्याच्या दुतर्फा दोन किमी परिसरात . आंबा, सीताफळ, रामफळ, जांभूळ, उंबर, करंज, कडूलिंब, बेल, जंगली ,चिंच ,वड ,शिसव , पेरू ,करंज फळझाडे, अशोक, पिंपळ, आदी प्रकारांसह सुमारे 307 वृक्षांचे वृक्षारोपण करून प्रतिष्ठानच्या सदस्यांकरवी त्याचे उत्तम संरक्षण, संवर्धन करण्यात येणार आहे.
वृक्षारोपणासाठी माळशिरस ,पंढरपूर ,सांगोला तालुक्यातील सुमारे 340 श्री सदस्य उपस्थित होते .वृक्षारोपण करून विश्वसेवा, राष्ट्रसेवा, मानवजातीची अंशिक सेवा करून सृष्टीच्या ऋणातून आंशिक मुक्तता मिळविण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संगोपन महत्त्वपूर्ण आहे.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात हजारो वृक्षांचे संगोपन अत्यंत नियोजनपूर्वक केले जात असून या सामाजिक चळवळीत श्री सदस्याचा उत्स्फूर्त सहभाग आहे. समर्थ बैठकीच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या वतीने लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यास मळोली ग्रामपंचायतचे सहकार्य राहील असे आश्वासन पंचायत समिती सदस्य तथा मळोली गावचे सरपंच श्री रणजीत बापू जाधव यांनी केले.
वृक्षारोपणप्रसंगी मळोली गावचे सरपंच श्री रणजीत बापू जाधव, उपसरपंच ॲड.महादेव पवार, सुरेश जाधव, संतोष जाधव , आप्पासो जाधव, राजाभाऊ जाधव , प्रताप घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.







