*बागेचीवाडी येथील गोकुळ अष्टमी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता*
माळशिरस -प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
बागेचीवाडी गावात गोकुळ अष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बाळगोपाळांच्या ग्रामदिंडीने झाली या सप्ताहात रोज नविन किर्तनकार यांचे किर्तन प्रवचन आयोजित करण्यात आली होती
या हरिनाम सप्ताहात बागेचीवाडी गावात भक्तिमय वातावरण तयार झाले होते गावातील प्रत्येक युवक या सर्व कार्यक्रमात हिरिरीने सहभागी झाले होते सप्ताह निमित्त गावात येणाऱ्या भाविकांचा यथोचित सन्मान गावाकर्यातर्फे करण्यात येत होता गावातील अनेक गावकऱ्यांनी अन्नदान करून परमार्थ साधला या कार्यक्रमाला गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते व कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपापल्या परीने योगदान देत होते..






