अकलूज येथे शेतकऱ्यांना 50% दरामध्ये आयएसआय मार्कचे नामांकित कंपनीचे औषध फवारणीचे बॅटरी पंप व वॉटर फिल्टरचे वाटप होणार
अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या सहकार्याने व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सौजन्याने शेतकऱ्यांना 50% दरामध्ये आयएसआय मार्कचे नामांकित कंपनीचे औषध फवारणीचे बॅटरी पंप व वॉटर फिल्टरचे वाटप या शिबिराचे उद्घाटन सोमवार दिनांक 26/ 8/2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व बाजार समिती सर्व संचालक, सचिव राजेन्द्र काकडे व परीसरातील सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे.
अकलूज येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेन गेट समोर हा कॅम्प सोमवार दि 26 आॅगस्ट सकाळी 10ते ते रविवार दिनांक 2 सप्टेंबर असा आठ दिवस शेतकऱ्यांच्यासाठी लावला असल्याची माहिती आयोजक- कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मारुतराव उर्फ आप्पासाहेब रुपनवर पाटील यांनी दिली.
नातेपुते येथील कॅम्प मध्ये अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला तसाच जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले.






