श्रावण मासानिमित्त अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने *श्री गुरु महाराजांची गूळ तुला कार्यक्रम* संपन्न
अकलूज (प्रतिनिधी )श्रावण मासानिमित्त अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाज, महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, वीरशैव लिंगायत महिला व भजनी मंडळ, उमाशंकर महिला रुद्र मंडळ, शिवशक्ती वीरशैव लिंगायत सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने *श्री गुरु महाराजांची गूळ तुला कार्यक्रम* अतिशय उत्साहात संपन्न झाला.

108 श्री राजगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज शिखर-शिंगणापूर व 108 श्री मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज वेळापूर यांचा तुलाभार व आशीर्वचन कार्यक्रम महादेव मंदिर अकलूज येथे दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाला.

प्रारंभी 21ऑगस्ट रोजी गांधी चौक ते विजय चौक येथील महादेव मंदिर अशी दोन्हीही महाराजांची रथातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन बहुसंख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.तसेच पुरुष देखील पारंपारिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते.
त्यानंतर महादेव मंदिर येथे गूळ तुला व आर्शीवचन कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद देण्यात आला.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी विविध मंडळाच्या सर्वं पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.















