*माळशिरस तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर येथील घटनेचा निषेध*
अकलूज (प्रतिनिधी )शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुका यांचे वतीने बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ, निषेध नोंदवून प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन, निवेदनाद्वारे बदलापूर येथील दोन्ही नराधमाला फास्टट्रॅक कोर्टामधून फाशीची शिक्षा व्हावी आणि बदलापूरचे शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांच्या वरतीही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व जमावा वरती लाठी चार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल करावे असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी तालुकाप्रमुख संतोष भैया राऊत, महादेव बंडगर,अनिल बनपट्टे, मिलिंद मोरे,संजय गुंड पाटील, दीपक दोरकर,साजीद सय्यद ,मनोज शेळके, प्रहार संघटनेचे नानासाहेब काळे,व इतर शिवसैनिक उपस्थित होते






