गेली जवळपास 25 वर्ष समाज कार्य करत असलेले असलम गुलाब तांबोळी यांची पुनश्च फायर ग्रुप संग्राम नगरच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अकलूज येथील दर्गाह मज्जिद जमात यांच्यातर्फे ही फायर ग्रुप संग्राम नगर येथे अध्यक्ष श्री असलम भाई तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी दर्गा मज्जित जमातीचे अध्यक्ष हुसेन भाई शेख ट्रस्टी सलीम सय्यद रशीद शेख हमीद मुलानी बुरुड समाजाचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी फिरोज शेख रमजान देसाई तनवीर मनियार इतर मान्यवर उपस्थित होते.













