भाजपचे युवा नेते भूषण कांबळे यांनी केला अर्धनारी नटेश्वर ला अभिषेक

अकलूज (प्रतिनिधी )धाराशिव येथून दोन वेळा खासदार झालेले शिवाजीराव कांबळे यांचे बार्शी येथील चिरंजीव भाजपा चे युवा नेते भूषण कांबळे हे देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत.
त्यांनी आजपर्यंत अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. सामाजिक कार्यात तर त्यांनी स्वतःला अक्षरशः झोकून दिले आहे.त्यांनी नुकतीच वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर मंदिरात महाभिषेक केला.एव्हढेच नव्हे तर गेल्या काही वर्षापासून माळशिरस तालुक्यातील नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत. विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत आहेत.त्यामुळे माळशिरस तालुक्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत
.विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर असून त्या पार्श्वभूमीवर भूषण कांबळे हे माळशिरस तालुक्यात सक्रिय होताना दिसत आहेत.आषाढी वारी काळात माळशिरस तालुक्यातील बहुतांश भागात वारकऱ्यांच्या स्वागताचे बॅनर देखील मोठया प्रमाणावर लावण्यात आले होते. तसेच माळशिरस येथे वारकऱ्यांना अन्नदान देखील करण्यात आले होते.
कदाचित माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असू शकतात असे बोलले जात आहे.






