*पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अहवानानुसार बागेचीवाडी गावात भव्य तिरंगा ध्वज फेरी काढण्यात आली*
संघर्ष योध्दा- माळशिरस प्रतिनिधी रणजीतदादा गायकवाड 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस या दिवसाचे औचित्य साधून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आवाहन केलं होतं की हर घर तिरंगा घर घर तिरंगा हा उत्सव देशाच्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात साजरा करण्यात यावा या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बागेचीवाडी. ता. माळशिरस या गावात आज दि.13ऑगस्ट रोजी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली या रॅली साठी गावचे लोकनियुक्त व लोकप्रिय सरपंच कृष्णराज माने पाटिल युवा नेते हंसराजभैय्या माने पाटिल यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य राहुल वाघ , बाळासाहेब भोसले, सौ राजश्री इंगळे, सौ दुर्गादेवी जगताप, ग्रामसेवक आलमगिर शेख.पोलिसपाटिल शंकर बागडे जि.प.शाळेचे मुख्याध्यापक अभिमान गायकवाड सर आरोग्य केंद्राचे डॉ गौरव जाधव अँड विरेंद्र वाघमारे सुधिर पवार यांच्यासह अंगणवाडी सेविका. आशा सेविका. आणी गावातील बहुसंख्य नागरिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. वंदेमातरम.भारतमाता कि जय आशा घोषणांनी गावचा परिसर दुमदुमून गेला होता व गावात स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने उत्साह संचारला आहे







