सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे :
स्वर्गीय विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकासमहामंडळ मंजूर व्हावे. यासाठी शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी नागपूर- रत्नागिरी रस्त्यावरती सांगोला नाका, मंगळवेढा येथे सकाळी ११ वाजता लोणारी समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन देण्यात आले.या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘लोणारी समाजाने महामंडळ मंजुरीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. विद्यमान ५४ आमदारांचे मागणीपत्रक देखील शासनाकडे आहे. वारंवार भेटी घेऊन आंदोलन करून निवेदन देऊन देखील शासन चालढकल करीत आहे. तरी शासनाने लोणारी आर्थिक विकास महामंडळ मंजूर करावे’ असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सुरेश निमग्रे, तुकाराम ढगे, यशवंत आकळे, पितांबर निमंगरे, सोमलिंग सांगोलकर, डॉ. सुदर्शन घेरडे, सागर गोडसे यांच्यासह तालुक्यातील लोणारी समाज मोठ्या संख्येने हजर होता.






