*संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन तर्फे पिलीव येथे ११०० झाडे लावून वृक्षारोपण*
संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन ब्रँच अकलूज व पिलीव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१०-०८-२०२४ रोजी पिलीव हद्दीतील वन विभाग प्राधिकरण क्षेत्रात विविध जातींच्या एकुण आकराशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमा साठी वन विभागाने संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन यांच्या सहकार्याने वन प्राधिकरण क्षेत्र पिलीव म्हसवड रोड येथील वन विभाग क्षेत्रात ११०० झाडे लावण्यात आली.संत निरंकारी मंडळ विविध सामाजिक उपक्रम या माळशिरस तालुक्यात घेत असते
यावेळी पिलीव जि.प.गटाचे माजी जि.प. सदस्य मा. गणेश पाटिल साहेब, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संत निरंकारी मंडळ हे जागतिक स्तरावर काम करते या मंडळाचे कार्य अतिशय प्रेरणादायी असते. वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय चांगला राबविण्यात आला सद्या काळाची गरज आहे. असेच वृक्षारोपण सारखे कार्यक्रम या पिलीव भागात झाले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी महादेव जरक, वनसंरक्षक सचिन पवार साहेब, संत निरंकारी मंडळ सोलापूर झोनचे सेवादल क्षेत्रीय संचालक मा. बाळासाहेब पवारजी, सोलापूर झोनचे ज्ञानप्रचारक चाँदभाई तांबोळी जी, जाधव वाडी ब्रँच मुखी तानाजी डुबलजी, नातेपुते ब्रँच इन्चार्ज शंकर कदमजी, पिलीव ब्रँच मुखी, टकलेजी, अकलूज ब्रँच कमेटी सदस्य लालासाहेब अडगळे, युनिट ८२५ संचालक दिलीप कांबळेजी, सोलापूर झोन ब्रँच अकलूज व पिलीव मधिल सर्वं प्रचारक, प्रबंधक, सर्व सेवादल व साधसंगत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलिप कांबळेजी यांनी केले सुत्रसंचलन अजिंक्य माने जी यांनी केले व आभार रमेश साळवे यांनी मानले.











