*ब्राह्मण सेवा संघ व श्री.गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने सामुदायिक श्रावणी सोहळा संपन्न*
येथील ब्राह्मण सेवा संघ व श्री. गणपती मंदीर ट्रस्टच्या वतीने नागपंचमीच्या मुहूर्तावर सामुदायिक श्रावणी सोहळा संपन्न झाला.
अकलूज येथील श्री. गणेश मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न होतो.यात यज्ञोपवीत बदलणे व इतर धार्मिक विधी केले जातात
. या कार्यक्रमासाठी अकलूज व परिसरातील समाजबांधवांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे पौरोहित्य श्री. गणेशकाका कुलकर्णी यांनी केले. यावेळी उपस्थित समाजबांधवांना श्री. नाना देशपांडे यांचेवतीने अल्पोपहार तसेच ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. हरिकाका कुलकर्णी यांचेवतीने फळे देण्यात आली. श्री. जयेश कुलकर्णी यांचेवतीने चहापानाची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्ट व पुरोहित संघाच्यावतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.






