अकलूज (प्रतिनिधी )दि 26/7/ 2024अकलूज येथील महावीर पथ ला असलेले हंगे इमारतीमध्ये असलेल्या पहिल्या मजल्यावर असलेले कॅनरा बँकेचे एटीएम दिनांक 25/7 /2024 रोजी पहाटे ,2/50 ते 3/15 वाजण्याचे सुमारास अनोळखी चोरट्याने सुमो गाडी मधून येऊन अंगावर ब्लॅंकेट पांघरून व चेहरा झाकून सोबत आणलेल्या स्प्रे मधून प्रथम एटीएम मशीनचे कॅमेरावर काळा रंगाचा स्प्रे रंग मारून तसेच एटीएम रूम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर व बाहेरील बाजूचे सीसीटीव्ही कॅमेरा वर काळे रंगाचा कलर स्प्रे मारून गॅस कटरने एटीएम मशीन कापून एकूण , एटीएम एटीएम मशीन मधील 2,20,300=00रुपये रोख रक्कम चोरून नेलेली आहे सदर बाबत बँक व्यवस्थापक अतिश अभिमन्यू देशमुख यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून दिनांक 25/ 7 /2024 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 385/2024 भारतीय न्याय संहिता कलम ,305(a),324(5) प्रमाणे दाखल झालेला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे हे करीत आहेत,





