*सकल मातंग समाजाच्या वतीने सूनिलभाऊ कांबळे हत्येच्या निषेध करण्यासाठी माळशिरसचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.*
(संघर्ष योध्दा प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड )
माळशिरस येथे सकल मातंग समाजाच्या वतीने सूनिलभाऊ कांबळे राहणार महुद तालुका सांगोला यांच्या हत्येचा कडाडून निषेध नोंदिण्यासाठी निषेध निवेदन नायब तहसिलदार मा . सिद्धनाथ जाविर साहेब यांना देण्यात आले. सुनीलभाऊ कांबळे राहणार महुद येथे धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची गावगुंडांनी हत्या केली माणुसकीला व मानवजातीला काळीमा फासणारी घटना घडली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
या वेळी बोलताना सरपंच सुभाष साठे तहसिलदार साहेबांना म्हणाले या घटनेचा आम्ही निषेध नोंदवत आहे आपन शासन स्थरावर मुख्यमंत्री व उपमख्यमंत्री यांना पाठपुरावा करावा जेणेकरून असे हल्ले होणार नाहीत. रोहिदास रणदिवे मत व्यक्त करताना म्हणाले माळशिरस तालुक्यामधील म्हाळुंग येथेही शिवाजी चव्हाण यांचा खूण केला गेला होता आपले शासन कायद्याच्या बाबतीत कमी पडत आहे. कायद्याचा दणका व हिसका गावगुंडांना दाखवा तसेच सोलापूर जिल्हा अधिकारी व सोलापूर पोलीस अधीक्षक यांना आपण पत्र व्यवहार करावा व गंभीर घटणा घडतात या सांगाव्या व केलेला पत्रव्यवहार आम्हाला पत्राद्वारे कळवावे. यावेळी सुधीर साठे सर तहसिलदार साहेबांना बोलताना म्हणाले सूनीलभाऊ कांबळे यांची हत्या करण्यात आली. मानवजातीला काळीमा फासणारी घटना घडली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात निषेधाची लाट वाऱ्यासारखी पसरत आहे या महाराष्ट्रात दलिंतावर मोठ्या प्रमाणात अन्याय-अत्याचायचे सत्र चालू आहे.मातंग समाजातील धडाडीने काम करणारे सूनीलभाऊ यांची निर्घृणपणे हत्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते.
आमच्या मागण्या१)आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे२)खूनाचा मूळ सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे ३)पिडीत कुटुंबीयांना पाच एकर शेती मिळालीच पाहिजे. ४) हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालू झाले पाहिजे.५) पिडीत कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 25 लाख रुपये निधी मिळालाच पाहिजे.६) पिडीत कुटुंबीयांचे पुनर्वसन झाले पाहिजे. तसेच होलार समाजाचे संजय गोरवे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला व सकल मातंग समाजाला पाठींबा दिला. मराठा समाजाने घटनेचा निषेध व्यक्त केला व सकल मातंग समाजाला पाठिंबा दिला. मुस्लीम समाजाने सकल मातंग समाजाला पाठींबा दिला.
बहुजन समाजाने निषेध निवेदनाला सकल मातंग समाजाला पाठींबा दिला. यावेळी नानासाहेब रणदिवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिपक खंडागळे शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख सतिश सपकाळ समिर शेख पत्रकार महेश मोहिते, समाधान आवारे, रोहिदास रणदिवे, संग्राम लांडगे, विशाल तूपसौंदर, किशोर तूपसौंदर, पोपट तूपसौंदर, बबन रणदिवे, माऊली खिलारे,सतीश सपकाळ, पत्रकार रणजीत गायकवाड, बापू खुडे, प्रनित खवळे, रोहित लांडगे,महेश मिसाळ, राजेंद्र शेलार,बाळासाहेब शेलार, धनाजी शेलार,अतुल नाईकनवरे,समाधान नाईकनवरे,सागर रणदिवे,शिवम लांडगे, लक्ष्मण रणदिवे, साचीन पाटोळे, संतोष रणदिवे, बंटी लांडगे, विठ्ठल कांबळे,जितेंद्र शींदे,महादेव खुडे, सुधीर साठे सर आदि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.






