*अकलुज येथील अकलाई देवी याञेनिमित्त मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली* गेली ४० वर्षांपासून अकलूज परिसरातील विविध मंडळे व विविध समाजाच्या वतीने सेवा करण्याचे कार्य करत आहेत.





संग्रामनगर दि.२० (केदार लोहकरे यांजकडून)अकलूज गावचे ग्रामदैवत अकलाई देवीचा यात्रा (भंडारा) येत्या मंगळवार दिनांक २३ व २४ जुलै २०२४ रोजी होणार आहे. अकलाई देवी देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वास्त जयसिंह मोहिते-पाटील आणि विश्वस्त कु.स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हि यात्रा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने दरवर्षी मंदिर आणि मंदिर परिसर स्वच्छ केला जातो.
गेल्या ४० वर्षापासून लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, साईबाबा सेवा ट्रस्ट,शिवरत्न गणेश उत्सव मंडळ,शिवगर्जना गणेशोत्सव मंडळ,पगडीचा राजा गणेश उत्सव मंडळ तसेच अकलूजमधील वीरशैव लिंगायत समाज,वडार,जोशी,बोहरी, पांचाळ सोनार व इतर समाजातील नागरिक, कार्यकर्ते, युवक वर्ग परिश्रम करून मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम केले जात आहे त्यासाठी अकलाई देवीच्या कळस व शिखरापासून ते देवीचा गाभारा,देवीचे आसनाचा परिसर व सर्व परिसर स्वच्छता करण्यात येत असते.
आनंदाचे बाब म्हणजे आजही चाळीस वर्षांपूर्वीची जी भाविक लोक देवीच्या मंदिरातील स्वच्छतेसाठी येत होते जे हयात आहेत ते आजही सेवेत सहभागी होत आहेत विशेष म्हणजे नवीन तरुण पिढी भक्तिभावाने यात सहभागी होत आहे.ही उल्लेखनीय बाब असून त्यामुळे पुढील भविष्य काळातही ही परंपरा कायम राहील यात काही शंका नाही.त्यासाठी अकलूज आणि परिसरातील नागरिकांनी उत्सवात भक्तीभावाने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोरसिंह माने- पाटील यांनी केले आहे.
या स्वच्छता कार्यात मंदिरातील मुर्ती व गाभारा स्वच्छ करण्यातसाठी किशोरसिंह माने-पाटील,त्रिंबक तात्या गुळवे,विठ्ठलराव गायकवाड, अशोक शेटे,आप्पा अवताडे,पिंटू वैद्य,महेश सूर्यवंशी,गणेश सटाले, सुरज बनसोडे,अजय पाटील, मोहन गुरव,अनिरुद्ध गुरव,मदन गुरव,अभिषेक गुरव यांचा समावेश असतो.या मंदिराच्या स्वच्छता कार्यात ज्या नागरिकांनी व भाविकांनी सहभाग असतो. त्यांचा अकलाई देवी देवस्थानच्या वतीने श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला जातो अशी माहिती किशोरसिंह माने-पाटील यांनी दिली.









