सोलापूर/प्रतिनिधी भैय्या खिलारे:
डोंगरगावं ता. मंगळवेढा येथे पंचबेबी देवस्थान यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंचबीबी जनता यात्रा उत्सव तथा शांतता कमिटी ग्रामपंचायत डोंगरगावं यांच्या वतीने देण्यात आली आहे.
24 जुलै ते 26 जुलै या तिने दिवसात यात्रा संपन्न होणार आहे. बुधवार दि. 24 रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत संदल मिरवणूक कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दिनांक २५ रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे सार्वजनिक जागेवर वृक्षारोपण, सकाळी ११ वा. ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्नेह मेळावा, दुपारी बारा वाजता पंचबेबी देवस्थान नैवेद्य कार्यक्रम व ग्राम प्रदक्षिणा, दुपारी दोन वाजता कुस्ती स्पर्धा, सायंकाळी सात वाजता पंचबेबी मंदिरात दीपोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच शुक्रवार दिनांक 26 रोजी सकाळी आठ वाजता लंगरखाना मिरवणूक, सकाळी 11 वाजता ग्रामस्थ व भाविकांचा वैयक्तिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
गतवर्षी तहसीलदार मदन जाधव व प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली झालेल्या गावकऱ्यांच्या पुढाकाराने यावर्षीपासून पंच बेबी उरूस व मरीमाता यात्रा दोन्ही एकत्रित घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी गावातील शंकर रामचंद्र मेटकरी, शिवाजी दाजी जाधव, समाधान हेंबाडे, मधुकर राजाराम मोरे,यशवंत ज्ञानू आकळे,बाबासो अंबीर सय्यद, दादासाहेब गुलाब पठाण,उत्तम नारायण भुसे,तुकाराम ईश्वर चौगुले,विशाल अभिमान साखरे,व सरपंच सारिका विवेक खिलारे यांच्यासह धोंडाप्पा कुंडलिक साखरे, सचिन कृष्णा आकळे,निसार रमजान पठाण, संगम भारत खडतरे, अमोल शंकर मेटकरी आदिच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन्ही उत्सव एकत्रित करण्याचा निर्णय गतवर्षी पासून घेण्यात आला आहे.चौकटडोंगरगावात मरवडे पॅटर्नपंचबेबी यात्रेनिमित्त डोंगरगाव मध्ये आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये आ. योगेश टिळेकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनामध्ये निकाली कुस्तीचे जंगी मैदान व 5000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून लेकीचे झाड उपक्रम बाहेरगावी गेलेल्या लेकींच्या हस्ते तिच्या नावाची झाड लावून त्या झाडाला नेमप्लेट लावली जाणार आहे
.ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्नेह मेळावा आयोजित केला असून त्यामध्ये गावातील उच्च पदावर कार्यरत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचा डोंगरगावं भूषण हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.






