पालखी सोहळ्यानंतर राष्ट्रीय सेवा संघ प्रणित सेवा सहयोग या सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वछता मोहीम अकलूज(प्रतिनिधी )काही वर्षांपूर्वी पालखी सोहळा पुढे गेला की मागे उरत होती ती अतिशय दुर्गंधी, त्यातून पसरणारी रोगराई व विस्कळीत होणारे जनजीवन.
परंतु अलीकडे ही परिस्थिती बदलली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून राष्ट्रीय सेवा संघ प्रणित सेवा सहयोग या सेवाभावी संस्थे च्या वतीने फिरत्या शौचालयाच्या प्रसारासाठी केलेली जनजागृतीतून मागे राहणारी दुर्मधी, रोगराई आता हदपार झाली आहे.
मनापासून विनामूल्य सेवा देणाऱ्या शेकडो युवकांच्या प्रामाणिकप्रयत्नातून हे शक्य झाले आहे.पालखी सोहळा पुढे गेला की मागे पावसाने या वारकरी भाविकांच्या उघड्यावरील विष्ठा, जेवणातील उघड्यावर पडलेल्या उष्टावळी कुजून जाऊन दुर्गंधी व त्यानंतर रोगराईच्या साथीही पसरत असत. ही दुर्गंधी व त्यानंतर पसरणान्या रोगराईने लोकांचे जीवन धोक्यात येऊ लागले.
त्यामुळे या सोहळ्याच्या विरोधात अगदी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या सोहळयावर आक्षेप घेऊन बंदीची मागणी केली गेली. मात्र एवढा मोठा उत्सव बंद करणे सोपे नव्हते., लोकांच्या भावनांचा प्रश्न होता.
*पहाटे 3 वाजल्यापासून जनजागृती.*
स्वयंसेवक पहाटे तीन वाजता पालखी, दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी पहारा देत, वारकरी भाविकांना उघड्यावर शौचाला न बसता या शौचालयाचा वापर करण्याचा आग्रह धरतात, त्यांना हात जोडून तशी विनंती करून शौचालयाचा वापर करण्यास भाग पाडतात. विशेष महणजे ही सगळी सेवा विनामूल्य असते,
अकलूजमध्ये शिवाजी घोडके, सचिन शिंदे,महेश वगरे, दिगंबर घोडके, निलेश शेंडे, गणेश विभुते, प्रविण रोडे, रविकांत ननवरे, कन्हैया देशपांडे, नागराज शिंदे,तुकाराम देशमाने, दिपक खंडागळे, विश्वजित देशपांडे सचिन आंचलकर, विशाल कुंभार आदी मंडळी यामध्ये हिरीरीने सहभाग घेतात, रोहित कुलकर्णी व शेखर माने हे विभाग प्रमुख म्हणून सर्व जुळवून आणतात.सदर सेवा १६मुक्कामी दिली जाते.
*असे चालते स्वयंसेवकांचे काम.*
लोकांच्या भावनांचा प्रश्न होता. म्हणून सन २०१५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत सेवा सहयोग या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लोणी काळभोर येथे प्रथम या फिरत्या शौचालयाचा प्रयोग करण्यात आला.तो यशस्वी झाल्यानंतर पंढरपूर येथेही वारी काळात हा प्रयोग राबविण्यात आला, त्यासही काही प्रमाणात यश आल्याने या संस्थेचा आत्मविश्वास बळावला व त्यांनी ही चळवळ उभारून त्यामध्ये त्या त्या गावातील तरुणांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला.
तेव्हापासून गेली ८ वर्षापासून ही सेवा सुरू झाली आहे. पालखी मार्गावरील प्रत्येक गावात ही योजना राबवण्यासाठी जवाबदारी निश्चित केली जाते. त्यानुसार प्रशासनाला फिरत्या शौचालयाची मागणी करतात. त्याठिकाणी वापरण्याचे पाणी, वीज याची सोय पहिली जाते. मैला विसर्जनासाठी शोषखड्ड्रे घेतले जातात. स्वयंसेवक नेमलेल्या जागेवर प्रामाणिक काम करत राहतो. स्वयंसेवकांना संस्थेमार्फत केवळ गणवेश वजा जाकीट, शिट्टी दिली जाते.
*चौकट :-.*•
समाजाकडून दुर्लक्षित असणारे काम आम्ही व आमचे देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर असणारे सहकारी मिळून करत आहोत. त्यामुळे परिसरातील घाण,दुर्गंधीमुळे पसरणारी रोगराई आटोक्यात येते.समाजाचे आरोग्य चांगले राहते.ही आमची माऊली व संत तुकाराम महाराज चरणों सेवाच आहे.आम्ही देहू ते पंढरपूर या मार्गांवरील ठिकाणचे स्वयंसेवक यांना सहभागी होण्याची संधी मिळतेय हे आम्ही आमचे भाग्य समजतो.”
*शेखर माने, स्वयंसेवक.*






